वादळे
ही कोणती भाषा,
तुज कळावया आता लागली
ही स्वप्ने कोणती,
तुज खुणवाया आता लागली II
गाव हा फुलांचा,
रस्ता हा भेटला तसा नवासा
भिजली पाकळी अन,
कळाया आता लागली II
वेडावल्या वयाच्या,
जाणिवा वेगळ्या हव्याशा
खूण कोवळी नवी
ही, छळाया आता लागली II
वादळे अंतरी काहुरांची,
अनोळखी, भेटली
नाव मनाची कुठे,
भरकटाया आता लागली II
रंग हळवे कोणते
हे भोवताली माझ्या असे
काजळाची सावली
तरी मिटाया आता लागली II
-
स्वप्नजा
No comments:
Post a Comment