आधार
जगात येऊन
या
मिरवायला स्वतः चा जयघोष
त्यांना लागतेच माझी कूस
कणभर पेशीपासून मूर्त रुपात येण्यासाठी
त्यांना जगावा लागतो
आयुष्याचा तो काळ
माझ्या अंधारलेल्या गर्भात
माझ्या संवेदना सगळ्या
अन् वेदना ही
जगतात ते ही माझ्यातून, तेव्हा
अगदी जवळून
तरीही....?
आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर
विसरतात ते गर्भातले माझ्या
ते क्षण, अन्
कुठे सुरु होतो त्यांचा प्रवास
पुरुषपणाच्या वाटेवर?
मर्दपणाच्या पायघड्या
वाटेवर पेरत, ते चालत रहातात
पायाखाली घेत, माझ 'मी' पण
चुरडल्या अंधारात मी रहाते शोधत
आत्म्यावर कोरलेले संस्कार
अन् गर्भवेणांचा आधार!!
- स्वप्नजा
मिरवायला स्वतः चा जयघोष
त्यांना लागतेच माझी कूस
कणभर पेशीपासून मूर्त रुपात येण्यासाठी
त्यांना जगावा लागतो
आयुष्याचा तो काळ
माझ्या अंधारलेल्या गर्भात
माझ्या संवेदना सगळ्या
अन् वेदना ही
जगतात ते ही माझ्यातून, तेव्हा
अगदी जवळून
तरीही....?
आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर
विसरतात ते गर्भातले माझ्या
ते क्षण, अन्
कुठे सुरु होतो त्यांचा प्रवास
पुरुषपणाच्या वाटेवर?
मर्दपणाच्या पायघड्या
वाटेवर पेरत, ते चालत रहातात
पायाखाली घेत, माझ 'मी' पण
चुरडल्या अंधारात मी रहाते शोधत
आत्म्यावर कोरलेले संस्कार
अन् गर्भवेणांचा आधार!!
- स्वप्नजा
No comments:
Post a Comment