मन
माझे
झाड पावसाच्या मिठीत
हळव्या दिठीत
हिरव्या रानात
स्तब्ध स्तब्ध
…….
पाखरू
ओलेत्या पंखात
बावऱ्या
पानात
धुंद
वाऱ्यात
स्तब्ध
स्तब्ध …….
चांदवा
गच्च
आभाळात
ओलेत्या
चांदण्यात
दाटल्या
गारव्यात
स्तब्ध
स्तब्ध …….
काजवा
वेड्या
झाडात
चिंब
पानात
पाखराच्या
कुशीत
स्तब्ध
स्तब्ध …….
मन
माझे तसे
ओलेत्या
झाडात
पाखराच्या
पंखात
काजव्याच्या
चांदण्यात
स्तब्ध
स्तब्ध …….
-
स्वप्नजा
Your feedback is most appriciated
ReplyDelete