Tuesday, 2 August 2016

मनातल्या कविता



सांजनिळाई

ती सांजनिळाई होती
डोळ्यांत हरवला मेघ
तो कृष्ण सावळा होता
यमुनेची सोबत रेघ
मी हळवी, वेडी कोणी
पाऊस झेलुनी धारा
सावळा लपेटून रंग
मज, गेला कोठे वारा?
हा ओला गंध स्वरांना
ही अशीच कातरवेळा
तो नभात गुंफून गेला
वेडाच सूरांचा झेला
मी भिजली कापूरवेल
तो हळवा पाऊस थेंब
थरथरते तळ्यात आता
लाजरे चंद्र प्रतिबिंब
मी उरले शब्दापुरती
तो गूढ अनाहत नाद
पावसात फिरुनी उमटे
ही कुठली नकळत साद?
                 -
स्वप्नजा

1 comment: