पावसाची गाणी
झाडे तरारून
आली
अशी चिंब
चिंब
माती
खोल मातीच्या
मनातली
आली फुलारून
नाती!
अशी रुजली
खोल
ओल
पानं ओलावली
सारी
झाड झाडाच्या
मिठीत
आणि मन आषाढा
संगती!!
रानातून मोर
हिरवे
निळे
चिंब झाडात
काजवे
पाना - पानाचे
स्वप्न
- ठाव
आता पाकळ्यांच्या
हाती!!
ओल्याचिंब पावसाची
आता
चिंब गाणी
झाडात,
मनात
तळव्यावर तळे,
इवलेसे
आणि मनात
थेंबांची
वसती!!!
-
स्वप्नजा
No comments:
Post a Comment